Breaking : दापोली रिसॉर्ट प्रकरणी माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना अटक

0

रत्नागिरी : दापोली रिसॉर्ट प्रकरणात माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने दिली आहे.

याआधी या प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. त्यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट बेकायदा बांधकाम प्रकरणी ‘ईडी’ पथकाने गेल्या शुक्रवारी १० मार्च रोजी पहाटे त्यांना ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे भाऊ आहेत. नुकत्याच खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग होता.

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
12:28 14-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here