१० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात वाढ

0

नवी दिल्ली : माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही वाढ करताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या (एससी-एसटी प्रवर्ग) विद्यार्थ्यांच्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. सीबीएससी बोर्डाने गेल्या आठवड्यातच या शुल्कवाढीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच ज्या शाळांनी जुन्या नियमानुसार दहावी-बारावीची परीक्षा नोंदणी सुरू केली आहे, त्यांना विद्यार्थ्यांकडून नव्या नियमानुसार शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, आता एससी-एसटी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ५० रुपयांवरून १२०० रुपये करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here