राज्यात कोरोनाचे २३४५ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गुरुवारी २३४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१,६४२ झाली आहे. दिलासादायक म्हणजे रुग्णांची संख्या वाढत असताना डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुरुवारी १४०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ११ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून आतापर्यंत १४५४ कोरोनाचे बळी झाले आहेत. तर राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here