साई रिसॉर्ट कथित गैरव्यवहार प्रकरण: सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

मुंबई : दापोलीतील रिसॉर्ट साई कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी अटक केलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

‘ईडी’ने कदमांच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावत हे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सदानंद कदम यांच्या घर कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर ईडीने त्यांना चौकशीला हजर राहाण्यासाठी समन्स बजावले होते. कदम हे चौकशीला हजर राहिले. चार तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. कोठडीची मुदत संपत असल्याने ईडीने कदमांना बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांची एकत्रित आणि समोरा समोर चौकशी करायची आहे, असे सांगत ईडीने कदमांच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 16-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here