नवीदिल्ली :रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नाचे नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केले आहे.
नोबेल समितीचे उपनेते आस्ले तोजे म्हणाले की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धाबाबत समज दिली, ते कौतुकास्पद आहे. त्यांनी धमकी/दबाव न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशा नेत्यांची गरज आहे.’
‘मोदी शांतता प्रस्थापित करू शकतात’
भारतीय पंतप्रधानांचे कौतुक करताना नोबेल समितीचे नेते आस्ले तोजे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात. पंतप्रधान मोदी हे अत्यंत विश्वासू नेते आहेत. तेच शांतता प्रस्थापित करू शकतात. पीएम मोदी हे जगातील मोठ्या राजकारण्यांपैकी एक आहेत आणि ते शांततेसाठी मोठे योगदान देत आहेत.’
‘भारत महासत्ता होणार हे निश्चित’
नोबेल समितीच्या नेत्याने भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान मोदींच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. ‘भारत हा शांततेचा वारसा आहे. भारत महासत्ता बनणार आहे. पीएम मोदी हे युद्ध थांबवणारे सर्वात विश्वासू नेते आहेत आणि ते जगात नक्कीच शांतता प्रस्थापित करू शकतात. मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीत तर जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही ते काम करत आहेत,’ असेही ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 16-03-2023
