”केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा फडणवीसांच्या लक्षात आल्याने वेगळ्या पॅकेजची मागणी करतायत”

मुंबई : ठाकरे सरकारविरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. एकीकडे केंद्राने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय, असे फडणवीस म्हणाले. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. पाटील म्हणाले की, केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते पॅकेजची मागणी करत आहेत. शिवाय केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here