कराचीमध्ये विमान कोसळले

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान कराची विमानतळाजवळील निवासी भागात कोसळले आहे. या विमानात ९० प्रवासी असल्याची माहिती असून लाहोरहून कराचीकडे हे विमान येत होते. या अपघाताचे कारण अद्याप समोर आले नाही. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, जीवितहानीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here