पुणे : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात आहे. यासाठी एक लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, या सर्व उमेवारांना त्यांच्या लॉगइन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा ही २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठीची प्रवेश पत्र दिनांक १६ मार्चपासून उमेदवारांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध केली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 18-03-2023
