मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये मोठ्याप्रमाणावर शिक्षकही सहभागी झालेत. त्यामुळे शिक्षण विभागाने तपासणीसाठी पाठवलेले पेपरचे गठ्ठे परत येतायत. त्यामुळे बोर्डामध्ये उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांचा खच साचू लागला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डाच्या कार्यालयात देखील उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पेपर तपासणीची पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे. पण निश्चित याचा परिणाम दहावी-बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे.
तर दहावीच्या 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता आहे. दहावी-बारावी परीक्षेचा निकाल एक आठवडा लांबणीवर जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 18-03-2023
