आमदार निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य मिळावे; आ. निकम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

चिपळूण : कोरोना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक साहित्य स्थानिक आमदार निधीतून तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने हा प्रादर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक साहित्य करता आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. इन्फ्रारेड थर्मामीटर चिपळूण तालुक्यासाठी सात व संगमेश्वर तालुक्यासाठी पाच इतके आवश्यक असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here