मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना स्वतः अडीच वर्ष काही केलं नाही, आणि याला ते द्या, त्याला हे द्या, आम्ही संपाला पाठिंबा देऊ म्हणत आहेत. जनाची ना मनाची लाज बाळगा, सत्ता गेल्याने पायाखालची वाळू सरकली आहे. पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागल्याची टीका नाव न घेता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
दरम्यान, राणे यांनी आपल्या नितेश आणि निलेश राणे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. निमित्त होतं ते माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे. ते सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये बोलत होते.
नारायण राणे पुढे म्हणाले की, “निलेश राणे आणि नितेश राणे ही दोन्ही मुलं महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मला त्यांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल गर्व आहे.” जिल्ह्यातील विरोधकांचा सामाजिक, विधायक, विकासात्मक काय कार्य आहे? असा सवालही त्यांनी केला. भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत एकही जागा विरोधी पक्षाला मिळता कामा नये असे आवाहन राणेंनी जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद शत प्रतिशत भाजप असण्याचं आवाहनही त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 18-03-2023
