मुंबई : आज दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. काल रजनीकांत वानखेडे स्टेडिअममध्ये हजर होत त्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच पाहिली आणि आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान त्यांच्यात कोणती चर्चा झाली हे अद्याप समोर आले नाही. रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली भेट ही कोणती राजकीय भेट नव्हती तर रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फार पूर्वीपासून चाहते आहेत.
त्यामुळे ते मातोश्रीवर आले होते. तर रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नाते संबंध आहेत, त्यामुळे ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही रजनीकांत हे मुंबई दौऱ्यावर असताना बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी रजनीकांत त्यांच्या रोबोट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत होते आणि त्यांनी मातोश्रीवर बाळा साहेबांची भेट घेतली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 18-03-2023
