लोकसहभागातून बंधारे चळवळ उभी रहायला हवी : अविनाश काळे

0

रत्नागिरी : अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे गोळप मधील मोरवठार वाडीच्या खालच्या बाजूला लोकसहभागातून नदीवर बंधारा बांधण्यात आला.

यावेळी मंडळाचे प्रमुख अँड. अविनाश काळे म्हणाले की, गेली तीन वर्षे मंडळातर्फे बंधारे बांधत आहोत. त्याचे अनेक फायदे होत आहेत. प्रत्येक गावात लोकसहभागातून अशा प्रकारे पाणी अडविले गेले पाहिजे. बंधारे हे कोणत्याही शासकीय खात्यांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून बांधले गेले पाहिजेत. गावोगावी बंधारे चळवळ उभी रहायला हवी.

तसेच खालच्या बाजूला दुसरीकडे असलेल्या सिमेंट बंधारा मधील दरवाजे बंद केले. त्यामुळे तिथेही चांगला पाणीसाठा झाला. यावर्षी जनसेवा मंडळातर्फे नद्यांवर सात बंधारे बांधण्यात आले. आज कोट्यावधी लिटर पाणी वाहून समुद्रात जाते. ते वाचवले पाहिजे

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड,अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य अँड. अविनाश काळे,सचिव समित घुडे,सदस्य महेश पालकर,रवींद्र पवार, अद्वैत काळे, सौ. मीनल घुडे इ. उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 18-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here