महिलांनी सक्षम होण्यासाठी सकारात्मक बनावे : नीलम पालव

0

◼️ वाटद कवठेवाडी शाळेचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा

खंडाळा : समाजात असणाऱ्या महिलांनी एकत्र येत संघटित होऊन स्वतः सक्षम बनण्यासाठी प्रयत्नशील असणे काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येक महिलेने जुन्या परंपरा, रूढी बाजूला करत सकारात्मक विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध व्याख्यात्या तथा अनुसया महिला बचत गटाच्या अध्यक्षा नीलम पालव यांनी व्यक्त केले.

त्या रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी यक शाळेच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, महिलांनी काळाची पावले ओळखणे आवश्यक आहे. यक जगात महिला ह्या सर्वत्र एकत्रितपणे व संघटितपणे कार्य करण्याची गरज आहे. त्यासोबतच बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत स्वतःसह कुटुंब स्वावलंबी बनवत आरोग्याच्या दृष्टीने विविध सवयी आत्मसात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे आरोग्य जपले पाहिजे असे आवाहन केले.

त्यानंतर महिला मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पा धर्माधिकारी यांनीही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वानी पुढाकार घेऊन कार्य केले पाहिजे. ज्या समाजातील सर्व महिला ह्या सक्षम असतात त्या समाजाचा विकास हा नक्कीच होत असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी शाळा परिसराच्या विकासासाठी अनेकांचे हातभार राहिले. अशा काही व्यक्तिमत्वांचा शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा प्रसादे यांनीही मनोगत व्यक्त करत शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला वाटद ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच सुप्रिया नलावडे, ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा प्रसादे, रेणुका धोपट, सपना बारगुडे, संपदा धनावडे, कोळी मॅडम, स्वाती धनावडे, यांच्यासह वाटद कवठेवाडी, वाटद धोपटवाडी, वाटद तांबटकरवाडी सह परिसरातील महिला, मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तारामती धनावडे, अक्षरा शिर्के, सरस्वती धनावडे, अनिता डुमनर, विजया तांबटकर, निकिता कुर्टे, प्रिया तांबटकर, सानिका आलीम, श्वेता धनावडे समीक्षा तांबटकर, नीलम धनावडे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, शाळा जिर्णोद्धार समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, पालक ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 18-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here