‘डॉक्टर आपल्या दारी’ मोहिमेतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

Portrait an unknown male doctor holding a stethoscope behind

रत्नागिरी : कोरोनाचा महामारीतही जनसेवेसाठी झटणाऱ्या शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने ‘डॉक्टर आपल्या दारी’ या मोहिमेतर्गत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शहरातील पोलिसबांधव लॉकडाउनच्या काळात भर उन्हातही सेवा बजावत आहेत. भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. २१) दुपारी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here