◼️ भाजपचा विकासकामांचा धडाका
◼️ मंत्री रवींद्र चव्हाण यांचे रत्नागिरीवर विशेष लक्ष
रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार आता पहिले मोठे विकासकाम मंजूर झाले आहे. हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते गावाला जोडणारा रस्ता व पूल या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपा नेते आमदार रवींद्र चव्हाण यांनी तब्बल तीन कोटी रूपये मंजूर केले आहेत. मंत्री चव्हाण यांनी विशेष लक्ष दिल्याने हे शक्य झाले आहे, असे सरपंच अमर रहाटे यांनी सांगितले.
मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत लवकरच कामाला सुरवात होणार आहे. यामुळे या वाड्यांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून पावसाळ्यातील गैरसोय दूर होणार आहे. विद्यार्थी, ग्रामस्थ, महिलांना याचा फायदा होणार आहे, असे सरपंच अमर रहाटे यांनी सांगितले.
पूल, रस्ता मंजुरीसाठी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी शिफारस केली होती. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी विकासकामाची मागणी केली होती. त्याला तत्काळ मंजुरी मिळाली.
धामणसें गावात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. ग्रामपंचायत पुन्हा मिळवण्याचे आव्हान सुपुञ व तालूकासरचिटणिस उमेश कुळकर्णी व सहकाऱ्यांनी पेलले व पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली. त्यावेळी ग्रामस्थांना रखडलेली व नवी विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. आता हळुहळू विकासकामे मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहे. पूल, रस्ता विकासकामांमुळे वाड्या, गावे जोडली जाणार आहेत. पावसाळ्यात सुमारे पाच महिने लोकांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे दैनंदिन गरजा भागवताना अडचणी येत होत्या. आता ही अडचण दूर होणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख विश्वास धनावडे यांनी सांगितले. रस्ता, पुलाची मागणी सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी धनावडे, अनघा जाधव, ऋतुजा कुळकर्णी व रेश्मा डाफळे केली होती. आता लवकरच पुलाच्या भूमीपूजनासाठी मंत्रीमहोदय येणार असल्याचे सांगण्यात आले.
