गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त चांदेराई मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

रत्नागिरी : चांदेराई वैश्य समाजाच्या वतीने दर वर्षी विविध कार्यक्रम संपन्न होतात.

पहाटे श्री देव chavhata येथे शिमग्याच्या दिवशी उभी केलेली होळी मानकरी व गावकरी यांच्या उपस्थित तोडण्यात येते. सायंकाळी 4 वाजता शोभा यात्रा काढण्यात येते, सायंकाळी 7 वाजता श्री देव शंकराच्या मंदिरातून वसंत पूजा आणली जाते.

अनेक वर्षाची परंपरा असणारे दत्त प्रसादिक मंडळाकडून दरवर्षी नाट्य प्रयोग सादर केला जातो.या नाटकाची परंपरा एवढी मोठी आहे की त्या काळात स्त्री पात्र काम करत नव्हते तेव्हा पुरुषच स्त्री पात्राची भूमिका करत होते.तर जेव्हा देश पारतंत्रात होता त्या वेळी इंग्रज सरकारचा सार्वजनिक कार्यक्रम करण्यास विरोध होता. त्यावेळी हा कार्यक्रम बंद करण्यास इंग्रज पोलीस येत होते परंतु त्या वेळी बाजूने वाहणाऱ्या काजळी नदीला भारती आली व पोलीस पलीकडे येऊ शकले नाहीत. जेव्हा ते आले तेव्हा कार्यक्रम संपला होता. त्या काळात विदयुत यंत्रणा नव्हती म्हणून त्या वेळेपासून सुरु असणारी दिवटी पाजळणे आजही सुरु आहे.

नाटक सुरु होण्याआधी मंगलाचरण सादर होते, त्यात देवाचे स्तवन केले जाते, व विदूषक, देव गणपती व देवी सरस्वती येऊन आशीर्वाद देतात.अशी इतिहासिक परंपरा असणारा अनादी काळापासून सुरु असणारा हा उत्सव चांदेराई मधील वैश्य समाज मोठ्या उत्साहात साजरा करतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 21-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here