गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार वार्षिक अंकाला राजा राजवाडे पुरस्कार

0

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार वार्षिकांकाला देवरूख येथील संस्थेचा राजा राजवाडे पुरस्कार मिळाला आहे.

महाविद्यालयाचा वार्षिक अंक म्हणजे महाविद्यालयाचा दस्तऐवज असतो.

महाविद्यालयीन विद्यार्थी नवलेखकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ असते. त्यातून सृजनात्मक संधी उपलब्ध होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार वार्षिक अंकाचा राजा राजवाडे पुरस्काराने सन्मान झाला असून महाविद्यालयीन वार्षिकांक २०२१-२२ स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यासाठी देवरूख येथील आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या वतीने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सहनिवडणूक अधिकारी मनोहर पारकर, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, संस्था उपाध्यक्ष श्री. कृष्णकुमार, उपप्राचार्य सरदार पाटील आणि प्राध्यापक उपस्थित होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे या गौरव समारंभास प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, सहकार अंकाचे संपादक डॉ. शाहू मधाळे, विद्यमान संपादक डॉ. तुळशीदास रोकडे उपस्थित होते. सहकार अंक डिजिटल आणि मुद्रित अशा दोन्ही माध्यमातून उपलब्ध असून हा अंक विद्यार्थ्यांच्या सकारात्मक शक्तीसाठी अभिव्यक्तीचे योग्य व्यासपीठ आहे, असे प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 22-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here