राजापूर : जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये पुस्तकांची गुढी उभी केली.
गावातील वयोवृद्ध विधावामाता निरंजनी मयेकर आणि चंद्रभागा मयेकर यांनी पुस्तकांच्या गुढीसमोर दीपप्रज्वलन केले. तसेच गुढीला पुष्पहार अर्पण केला. उपस्थित महिला आणि विद्यार्थिनींनीही पुस्तकांच्या गुढीचे पूजन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके भेट देण्यात आली.
राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या अक्षरमित्र ग्रंथालय चळवळीचा अधिक प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी पाडव्याच्या दिवशी पुस्तकांची गुढी या वेगळ्या उपक्रमाचे छोटेखानी आयोजन केले होते. विधवा मातांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी आणि या उपक्रमाची सुरुवात अशा छोट्या कार्यक्रमातून आपल्याकडूनच व्हावी, याच भावनेतून या गुढीचे पूजन आपल्या गावातील विधवा मातांच्या हस्ते केले, असे श्री. गोंडाळ यांनी सांगितले.
या उपक्रमाला त्यांची पत्नी सौ. मालती गोंडाळ यांची उत्तम साथ मिळाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:43 22-03-2023
