पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाच्या नैवद्यासाठी आणि आमरस बनवण्यासाठी हापूस आंब्याला मोठी मागणी असते. मात्र हापूस आंब्याला हवामान बदलाचा फटका बसला असून, फळावर डाग पडत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात आंब्याचे चांगले पीक निघेल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यांतून कर्नाटक आणि केरळ येथून आंब्याची आवक होत आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. पहिल्या हापूस मोहोराचे उत्पादन कमी असेल तरी बाजारात सध्या आवक चांगली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:00 22-03-2023
