मचाणावरून पडून गुरख्याचा मृत्यू

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत रखवाली करणाऱ्या एका गुरख्याचा मचाणावरून खाली पडल्याने मृत्यू झाला. रत्नागिरीजवळच्या आंबेशेत येथील वायंगणकर यांच्या बागेत ही घटना घटली. तेथे रखवालीसाठी असणारा सोनूराम डागौरा (मूळ, रा. नेपाळ) शुक्रवार सकाळी साडेसहाच्या सुमारास तो मचाणावरून खाली कोसळला. त्याला उपचारासाठी रत्नागिरीतील रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्याला औषधोपचार करून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र काही वेळाने त्याची तब्येत बिघडली. त्याला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले असता तो मरण पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:23 PM 23-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here