ई-मेल, संकेतस्थळ आता देवनागरीत

0

रत्नागिरी : युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स क्लॉजअंतर्गत ई-मेल पत्ता, संकेतस्थळ पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे.

प्रगत संगणक विकास केंद्राने (सी-डॅक) त्यासाठी पुढाकार घेतला असून, सुरुवातीला ५० सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या इंटरनेटवर ई-मेल, संकेतस्थळांचे पत्ते केवळ इंग्रजीत आहेत; मात्र देशभरात विविध भाषा असल्याने इंटरनेट बहुभाषिक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने युनिव्हर्सल क्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत देशभरात सरकारी संकेतस्थळांचे पत्ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सी-डॅककडून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. ‘डॉट भारत’ हे डोमेन नोंदणीकृत करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 24-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here