खेडच्या विद्यार्थ्याचा दुधेरे येथे अपघाती मृत्यू

0

खेड : मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे खेड-पुरार राज्यमार्गावरील पुलालगत रविवारी दि. २६ रोजी मध्यरात्रीनंतर झालेल्या दुचाकी अपघातात चिपळूण येथील मूळ रहिवासी असलेला मात्र ज्ञानदीप विद्यालय खेडमध्ये इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

दुचाकीवरून प्रवास करणारा दुसरा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

या संदर्भात पोलिसांकडून व मिळालेल्या घटनास्थळावरुन माहितीनुसार, दुधेरे पुलानजीक दि. २६ रोजी मध्यरात्रीनंतर सोमवारच्या पहाटे मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकी (एम.एच. ०८ ए. एम. ३५५६) ला एका अवघड वळणावर अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला दुचाकीवर स्वार दोन्ही तरुण फेकले गेले व गंभीर जखमी झाले. स्थानिकांना सकाळी गाडीचा चालक शुद्द अवस्थेत दिसून आला त्यांनी ही माहिती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंडणगड पोलीसांना कळवली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या नंतर त्यांनी पंचनामा केला. या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणारा पार्थ विजय इंदुलकर ( १७, मूळ रा. पिंपळी तालुका चिपळुण) याचा अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला आहे. दुचाकी चालक सिध्दांत अरविंद माने (१८ राहणार भडगाव तालुका खेड ) हा या अपघातात गंभीर जखमी असून त्याला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे नेण्यात आले. त्यास अधिकच्या उपचाराकरिता येथे मुंबई पाठवण्यात आले. अपघात नक्की कसा झाला या संदर्भात स्थानीक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here