मुंबई विद्यापीठाला मॉरिशस च्या मराठी कल्चर सेंटर ने आमंत्रित केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या 20 विद्यार्थ्यांना 5 सप्टेंबर 2019 रोजी मॉरिशस येथे आमंत्रित केले आहे. मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रमुख पाहुणे असणार आहेत.
कु. वैष्णवी जोशी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव मध्ये शास्त्रीय आणि सुगम गायनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून आपल्या प्रतिभावान गायकीने आंतरराष्ट्रीय स्तरावर गायनासाठी संधी निर्माण केली. वैष्णवीने श्रीमती संगीता बापट यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेत आहे.ती विशारद पूर्ण आहे.मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे आणि रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. आनंद आंबेकर यांच्या समनव्यातुन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्याशी अमोल सहकार्यामुळे तसेच वैष्णवीचे वडील श्री. धुंडिराज जोशी यांच्या पाठिंब्यामुळे आणि हा कार्यक्रम आयोजन करणारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्या प्रयत्नामुळे वैष्णवी जोशी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी पहिली गायिका विद्यार्थिनी ठरली आहे.
तिचे अभिनंदन करण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर,प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आनंद आंबेकर , प्रा.श्रीकांत दुदगिकर, श्री. धुंडिराज जोशी, श्री. प्रसाद गवाणकर उपस्थित होते.
वैष्णवीच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल आजी माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,र.ए. सोसायटीच्या कार्यध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन र.ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
