गुरखा मजुरांसाठी रेल्वे सोडा : बाळ माने

रत्नागिरी : कोकणामध्ये हापूस आंबा बागांच्या विविध कामांसाठी हजारो मजूर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान कोकणात दाखल होतात. दरम्यान, जिल्ह्यात आंबा बागांच्या देखभाल, रखवाली व आंबा व्यवसायातील हंगामी कामासाठी नेपाळमधून आलेल्या हजारो गुरखा मजुरांसाठी मडगाव ते मथुरा अशी विशेष गाडी रेल्वेने चालू करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार श्री. बाळ माने यांनी रेल्वेमंत्री व कोकण रेल्वेचे सीएमडी यांच्याकडे केली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे या मजुरांना परत जाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. दरवर्षी 31 मे ते 15 जून या कालावधीत हे सर्व मजूर कोकण रेल्वेने मथुरा रेल्वेस्थानकापर्यंत जाऊन तिथून बसने मायदेशी रवाना होतात. लॉकडाऊनमुळे या मजुरांना मथुरापर्यंत जाण्याकरिता विशेष रेल्वेची गरज आहे. 7 जूननंतर गरजेनुसार गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपचे माजी आमदार श्री. बाळ माने यांनी रेल्वेमंत्री व कोकण रेल्वेचे सीएमडी यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:39 PM 23-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here