कोळंबे पंचक्रोशीतील पथदीप बंद

0
A Streetlamp comes to life upon sunset/dusk.

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे, सोनगिरी, कुरधुंडा, डिंगणी, फुणगुस परिसरातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. यामुळे ग्रामस्थांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पथदीप नसल्याने ग्रामस्थ गेले १० दिवस अंधारातून प्रवास करत आहेत. प्रशासनाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दलित वस्ती, मोहल्ला, आंबेड बु. गावाकडे, वाडी वस्तीवरील रस्त्यावर लावण्यात आलेले पथदीप वीजबिल न भरल्यामुळे बंद करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना अंधारात चाचपडत प्रवास करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीला याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत देवरूख पंचायत समितीकडे बोट दाखवत आहे. पंचायत समिती मात्र बिल भरण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे वीज पुरवठा महावितरणकडून बंद करण्यात आला आहे. मागील बिल हे ग्रामपंचायतींनी भरले होते, मात्र आता पंचायत समितीने बिल भरणे आवश्यक असताना पंचायत समिती अधिकारी जिल्हा परिषदेकडे बोट दाखवत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here