आधार-पॅन लिंक करण्याच्या मुदतीत पुन्हा वाढ, आता ३० जूनपर्यंत वेळ | Aadhaar pan link

0

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजेच CBDT नं पॅन (PAN) नंबरला ‘आधार’शी लिंक Aadhaar pan link करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता ही मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

करदात्यांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी आणखी थोडा कालावधी देण्यात आला आहे. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी लिंक केलेलं नाही ते ३० जूनपर्यंत लिंक करू शकतात. CBDT ने PAN ला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत पाचव्यांदा वाढवली आहे.

आयकर कायदा १९६१ च्या कलम 139AA नुसार, ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन दोन्ही आहेत त्यांना ही दोन कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. आता त्याची अंतिम तारीख ३० जून करण्यात आली आहे. CBDT नुसार, शेवटची तारीख संपल्यानंतर तुमचं पॅन कार्ड काम करणार नाही आणि तुम्ही वित्त संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. बँक खात्याशी संबंधित व्यवहारही करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत, या मुदतवाढीमुळे अशा लोकांना दिलासा मिळणार आहे, ज्यांनी अजूनही पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं नाही.

पॅन-आधार लिंक स्टेटस ऑनलाइन कसं तपासून पाहाल?

  • आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा.
  • होमपेजवरील ‘क्विक लिंक्स’ पर्यायावर क्लिक करा. यानंतर, ‘आधार स्टेटस’ निवडा.
  • तुम्हाला पॅन आणि आधार क्रमांक टाकण्यासाठी दोन रिकाम्या जागा दिसतील.
  • पॅन आणि आधार क्रमांक नमूद करा
  • त्यानंतर, सर्व्हर पॅन-आधार लिंक स्थिती तपासतो आणि एक पॉप-अप संदेश देतो.
  • जर दोन्ही कार्ड लिंक झालेले असतील तर, “तुमचा पॅन आधीच दिलेल्या आधारशी लिंक केलेला आहे” असा संदेश येईल.
  • तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केलेले नसल्यास, पॅन आधारशी लिंक नाही असा संदेश दिसेल. तुमचा आधार पॅनशी लिंक करण्यासाठी कृपया ‘Link Aadhaar’ वर क्लिक करा.
  • लिंक प्रक्रियेत असल्यास, करदात्याला त्याच्या विंडोवर दिसेल की तुमची आधार-पॅन लिंकिंग रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनसाठी UIDAI कडे पाठवली गेली आहे. कृपया मुख्यपृष्ठावरील ‘लिंक आधार स्टेटस’ या लिंकवर क्लिक करून नंतर स्टेटस तपासा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here