बंगला खाली करण्यास सांगितल्याने राहुल गांधी भावूक..

0

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली होती.

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाच्या पत्राला उत्तर दिलं आहे. त्यात ते लिहितात की, लोकसभेचं सभासदत्व रद्द करण्यात आल्यानंतर आपल्या सरकारी बंगल्याला रिकामी करण्यासंदर्भात मी माझ्या अधिकारांना सुरक्षित ठेवून सचिवालयाच्या पत्रात देण्यात आलेलल्या विवरणाचं पालन करेन.

गेल्या आठवड्यात सूरतमधील एका न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं सभासदत्व रद्द केलं होतं. तसेच राहुल गांधींचं सबासदत्व रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना पत्र पाठवून २२ एप्रिल पर्यंत सरकारी बंगला रिकामी करण्याची सूचना दिली होती.

राहुल गांधी यांनी १२ तुघलक लेन येथील बंगला रिकामी करण्याबाबत २७ मार्च २०२३ रोजी मिळालेल्या पत्राबाबत लोकसभा सचिवालयाचे आभार मानले. ते म्हणाले की, गेल्या ४ कार्यकाळांपासून लोकसभा सदस्य या नात्याने हा जनतेचा आदेश आहे., ज्याबाबत मी येथे घालवलेल्या काळातील सुखद आठवणींसाठी मी ऋणी राहीन. ही नोटिस पाठवणाऱ्या लोकसभा सचिवालयाच्या एमएस शाखेला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी आपल्या अधिकाऱांना सुरक्षित राखत ते सचिवालयाकडून दिलेल्या विवरणाचं पालन करतील, असं सांगितलं.

राहुल गांधी हे २००५ पासून १२, तुघलक लेन स्थित बंगल्यामध्ये राहत आहेत. सूरतमधील एका कोर्टाने मोदी आडनावाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी सूरतमधील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींवर अपात्रतेची कारवाई करत त्यांचं सभासदत्व रद्द केलं होतं. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, कुठल्याही संसद सदस्याचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्याला एका महिन्याच्या आत आपलं घर रिकामी करावं लागतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here