करंबेळे धरण क्षेत्रात मृतावस्थेत आढळला गवारेडा

0

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील धरण क्षेत्रात गवारेडा मृतावस्थेत आढळून आला.

याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंबेळे धरण क्षेत्रात गवारेडा मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती गावचे पोलीस पाटील खाके यांनी वन विभागाला दिली.

यानंतर रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला आणि वनरक्षक अरुण माळी, वनरक्षक राजाराम पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी मृत गव्याची पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून आली नाही. त्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर डॉ. कदम यांनी गव्याचे शवविच्छेदन केले. गव्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गव्यावर त्याच ठिकाणी वन विभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here