रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची स्थापना १ एप्रिल १८७६ साली झाली. तब्बल १४७ वर्षानंतर १ एप्रिल २०२३ रोजी रनपचा स्थापना दिवस साजरा होणार आहे.
या निमित्ताने मागच्या ५ वर्षाच्या कालावधीतील माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे पदावर उतरल्यानंतर जे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक रनप कार्यालयात येत नव्हते ते या दिवशी एकत्रितपणे दिसण्याचा योग येणार आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी नगरपरिषदेचे अनेक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरपरिषदेत येणे टाळतात. जी काही कामे असतील ती मोबाईलवरून संपर्क साधन मार्गी लावतात. मात्र १ एप्रिल रोजी रनपच्या स्थापना दिवशी कार्यालयात येणार्या आणि न येणार्या माजी लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे.
नगराध्यक्षांमध्ये विद्यमान आमदार डॉ राजन साळवी, प्रमोद रेडीज, प्रदीप उर्फ बंड्या साळवी, महेंद्र मयेकर, मिलिंद कीर, राहुल पंडित, मधु घोसाळे, राजेश्वरी शेट्ये इ. माजी नगराध्यक्षांना या निमित्ताने नपच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.
मागील कालावधीतील वर्षाच्या ३० माजी नगरसेवकांनाही निमंत्रित केले जाणार आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. नगरविकास मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे नगरपरिषदांना स्थापना दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:05 28-03-2023
