खेडशीत आज पुन्हा ‘डॉक्टर आपल्या दारी’

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार (दि. २५ मे) खेडशीतील मुख्याध्यापक भवनात पुन्हा एकदा ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्या सोमवारी झालेल्या शिबिरात अनेकांना वेळेअभावी परत जावे लागले होते. त्यांच्यासाठी सोमवारी सकाळी १० ते दुपारी दीड या वेळेत हे शिबिर होणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन खेडशी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ५ चे सदस्य वसंत सो. बंडबे आणि स्नेहा स. लाखण यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:57 AM 25-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here