साळवी स्टॉप येथे नगरपालिका कर्मचारी अपघातात गंभीर जखमी

रत्नागिरी : साळवी स्टॉप येथे जलतरण तलावाजवळ रत्नागिरी नगरपालिकेत काम करणारा कर्मचारी विनोद जाधव रविवारी जखमी अवस्थेत पडलेला सापडले. हे कर्मचारी कुणाच्यातरी दुचाकीवरून येत असताना मोटारसायकलने ठोकरले व रस्त्यावर जखमी होऊन पडले असे बोलले जात आहे. मात्र या दोन्ही वाहनचालकांनी जाधव यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून पळ काढला आहे. या कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. ज्या ठिकाणी हा कर्मचारी पडला होता तेथे रक्ताचे पाट वाहत होते. अधिक उपचारासाठी या कर्मचाऱ्याला आता कोल्हापूर येथे हलवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here