खेड येथे क्वारंटाईन असेलल्या चाकरमान्याची आत्महत्या

खेड : मोरवंडे-मोदगेवाडी (ता. खेड) येथील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलेल्या चाकरमान्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपुर्वी मुंबईतून गावी आलेल्या त्याला उपजिल्हा रुग्णलयात क्वारंनटाईन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. शुक्रवारी तो वाडीत आल्यानंतर त्याला येथील शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. शनिवारी 4 वाजेपर्यंत तो शाळेच्या पडवीत बसलेला ग्रामस्थांनी पाहीले होते. सायंकाळी त्याचे नातेवाईक त्याला जेवण द्यायला गेले तेव्हा तो शाळेच्या खोलीमध्ये गळफास घतलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. ग्रामस्थांनी याबाबत खेड पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर खेड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यावर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी मोरवंडे येथील स्मशानभुमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खेड पालिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:01 AM 25-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here