पाचशे रिक्षाचालकांना विम्याचे कवच

0

चिपळूण : येथील सेनेचे शहरप्रमुख, पालिकेतील मागासवर्गीय समितीचे सभापती नगरसेवक उमेश सकपाळ यांचा १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने सामाजिक भान जपणारे श्री. सकपाळ हे शहरातील पाचशे रिक्षाचालकांना विम्याचे कवच देणार आहेत. सकपाळ यांचे सामाजिक काम मोठे आहे. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता ते अनेक संस्थांना, गरजूंना मदत करीत असतात. वाढदिवस साजरा करताना ते सामाजिक उपक्रम राबवितात. रिक्षाचालक म्हणून काम करताना ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुढे आले. रिक्षाचालक म्हणून सेवा दिल्यामुळे त्यांना रिक्षाचालकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून रस्ता आपत्ती पॉलिसी ते देणार आहेत. या पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास २५ हजार तसेच जखमी झाल्यास उपचारासाठी २५ हजार रुपये मिळू शकतात. शिवाय सर्प, विंचूदंश झाल्यास, झाडावरुन पडल्यास, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यासही वारसांना नुकसान भरपाई मिळते. या उपक्रमाबद्दल रिक्षाचालकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here