राज्यात एकाच दिवसात ८७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात ८७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १७५८ वर गेला आहे. यापैकी ६७३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात दिवसाला ६० ते ७० हून अधिक पोलीस कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १८ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. त्यात मुंबई पोलीस दलातील ११ पोलिसांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here