व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात

0

नावी दिल्ली : अनेक दिवसांपासून महागाईचा झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 2023 रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किमतीत मोठी कपात केली आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरचे दर 91 रुपये 50 पैशांनी कमी केले आहेत. ही कपात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात (Commercial Cylinder Price) करण्यात आली आहे. दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंदरच्या दरात कोणतेहे बदल झालेले नाहीत, ते जुन्या दरांतच उपलब्ध आहेत. 91.50 रुपयांच्या कपातीनंतर मुंबईसह संपूर्ण देशात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यात बदल करतात. दर कपातीनंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कोणत्या शहरात किती आहेत हे जाणून घेऊया?

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (19 किलो)

दिल्ली – 2028 रुपये
कोलकाता – 2132 रुपये
मुंबई – 1980 रुपये
चेन्नई – 2190.50 रुपये

मार्चमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 350.50 रुपयांनी वाढ

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर वर्षभरात कमी-जास्त होत आहेत. मागील वर्षी याच दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 2022 रोजी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचा दर 2,253 रुपये होता. आज तो 2028 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात केवळ 225 रुपयांची कपात झाली आहे. ही 1 मार्च 2023 रोजी एका झटक्यात व्यावसायिक दरात 350 रुपयांनी वाढ झाली होती.

पेट्रोलियम आणि ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी यावर्षी 1 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 350.50 रुपये प्रति युनिट आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली होती.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल नाही

दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात 1 मार्चपासून कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1,103 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर 1112.5 रुपये, कोलकात्यात 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,118.5 रुपये दराने मिळत आहे. दरम्यान 2022 मध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 01-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here