ना. उदय सामंत यांचा विकास कामांचा धडाका; कोतवडे जि.प.गटातील 6 गावांमधील एकूण 16.35 कोटींच्या कामांचे भूमीपूजन संपन्न

रत्नागिरी : ना.उदय सामंत यांचा रत्नागिरी मतदार संघांमध्ये झंजावती दौरा सुरु झाला असून आजच्या या त्यांच्या दौऱ्यामध्ये कोतवडे जि.प.गटातील भगवतीनगर, निवेंडी, ओरी, जांभरुण, वेतोशी, कोतवडे या 6 गावांमध्ये सन 2022-23 मध्ये मंजूर केलेल्या 16.35 कोटींच्या कामांचे भूमीपूजन संपन्न झाले.
यामध्ये प्रामुख्याने भगवतीनगर गावातील 1 कोटी 2 लक्ष ची कामे, निवेंडी गावातील 3 कोटी 84 लक्षची कामे , ओरी गावामधी 1 केाटी 37 लक्ष ची कामे , जांभरुण गावातील 99 लक्ष, वेतोशी गावामधील 6 कोटी 35 लक्ष, कोतवडे गावातील 2 कोटी 78 लक्ष इतक्या मंजूर निधीचा कामांचा समावेश असून एकूण 62 कामांची भूमीपूजने संपन्न झाली.
ना.सामंत यांचा गावानिहाय दौरा स्थानिक पदाधिकारी व त्या-त्या गावातील ग्रामस्थ यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. ना.सामंत यांनी मंजूर केलेल्या या कामांमध्ये गाव पातळीवरील विकास कामांना चालना मिळाली असून आवश्यक असणारी कामे मंजूर झाल्यामुळे त्या-त्या गावातील ग्रामस्थ समाधानी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
राज्यामध्ये उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना आपल्या मतदार संघातील ग्रामस्थांच्या नेमक्या गरजा काय आहेत हे लक्षात घेवूनच नामदार सामंत यांनी ही कामे मंजूर केली असल्यामुळे त्या-त्या गावातून समाधान व्यक्त केले जात आहे.
ना.उदय सामंत यांच्या समवेत जिल्हाप्रमुख राहुल पंडित, विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, उपजिल्हाप्रमुख प्रकाश साळवी, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, महिला जिल्हा तालुका संघटक कांचन नागवेकर, युवा तालुका अधिकारी तुषार साळवी, विभाग प्रमुख स्वप्निल मयेकर, उपविभाग प्रमुख स्वप्निल पडयार,उपविभाग प्रमुख बावा हळदणकर,उपतालुका प्रमुख दिलीप शिवलकर, बंडू कुलकर्णी, प्रवीण जोशी,प्रकाश कदम, अमित घनवटकर, मंदार थेराडे, गौतम सावंत, रोहीत मयेकर, सरपंच ओरी – आकांक्षा देसाई, उपसरपंच ओरी संकेत देसाई , सरपंच वेतोशी अरुण झोरे,प्रकाश भुते,भाई गोवळकर, अमोल बळकटे, महेंद्र आग्रे,मुकेश भुते,शैलेश बळकटे, सचिन चौघुले,संतोष कोकरे,सतीश सोबळकर ,अतुल पाटील,प्रशांत मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here