तिसंगीत होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

खेड : तालुक्यातील तिसंगी गाव व पंचक्रोशीतील सुमारे २०३ कुटुंबीयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या होमिओपॅथिक रोगप्रतिकारक शक्ती वर्धक औषध ‘अर्सेनिक अल्बम ३०’ गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच लोकांनी या गोळ्या कशा घ्याव्यात याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे डॉ. शिवदास भोसले व डॉ. अजित भोसले यांनी औषध उपलब्ध करून दिले. तिसंगी पंचक्रोशीत औषध वाटपासाठी मराठा कर्मचारी संघटना अध्यक्ष चंद्रशेखर भोसले, सुरेश भोसले,चिपळूण नागरी पतपेढी संचालक रवींद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य विकास भोसले, अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळाचे अध्यक्ष शैलेश भोसले, भागेश भोसले, श्रीकांत रांगले, भरत जाधव, महेश भोसले व अन्य ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here