कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात मॉकड्रील; प्रशासन अलर्ट

0

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासन जागरुक झाले आहे. कोविडच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजारी यांनी व्हीसीद्वारे जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांचा आढावा घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सतर्कता बाळगण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार रुग्णालयांची तयारी आणि मॉकड्रील करून घेण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवे 27 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 5 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 22 रुग्ण गृह विलगीकरणामध्ये आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी विशेषतः सहव्याधी असणान्या व्यक्ती आणि वृद्ध व्यक्तींनी जाणे टाळावे. डॉक्टर, पॅरामेडीक्स आणि रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये मास्कचा वापर करावा. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे, शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल आणि टिश्यु वापरणे, हाताची स्वच्छता राखणे, हात वारंवार पुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनाला त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत कोविड चाचणी करावी. अशा विविध उपाययोजना आणि सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 04-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here