निलेश राणेंकडून राजापुरातील डॉक्टरांसाठी पीपीई किट

राजापूर : कोरोना विषाणूच्या संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्या तालुक्यातील डॉक्टरांसाठी भाजपचे युवा नेते व रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत. राजापूर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना हे किट भेट दिले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र नागरेकर यांनी ही किट राजापुरातील डॉक्टरांना सुपूर्द केली आहेत. बालरोगतज्ञ डॉ. उमेश चव्हाण यांनी निलेश राणे यांनी या पीपीई किटचा पुरवठा केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. या प्रसंगी भाजपाचे मोहन घुमे, दिलीप पवार उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:29 PM 25-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here