राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार मातोश्रीवर दाखल; संजय राऊतांनी फेटाळली उलटसुलट चर्चा

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. ‘शरद पवार मातोश्रीवर आले यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं नाही. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मजबूत आहे. शरद पवार हे स्वत: सरकारच्या कामगिरीवर संतुष्ट आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही. महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. कोणीही फुटणार नाही, फुटलं तर विरोधी पक्षाचं नशीबच फुटेल, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला लगावला. तसेच महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचं भाजपचं सरकार लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं, तिकडे संकट गंभीर आहे, तिथे जाऊन ते राज्य निर्माण करु शकतात, अशीही टोलेबाजी त्यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:46 AM 26-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here