विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) : विशाखापट्टणम येथील समुद्रात एका जहाजाला भीषण आग लागली. यामुळे आग लागलेल्या जहाजावरील २९ कर्मचाऱ्यांनी जीव वाचविण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. यातील २८ जणांना भारतीय तटरक्षक दलाने वाचविले. मात्र, यातील एक कर्मचारी बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील समुद्रातील जहाजांना अन्न, पाणी पुरवठा करणाऱ्या एका जहाजाला आज सकाळी ११.३० वाजता भीषण आग लागली. या जहाजात २९ कर्मचारी होते. त्यांनी आगीच्या घटनेनंतर समुद्रात उड्या मारल्या. त्यांना तटरक्षक दलाच्या जवानांनी वाचविले. या जहाजाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
