मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी

0

नवी मुंबई : ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने गुजरात आणि मुंबईच्या समुद्रात १४ नव्या तेल-वायू शोध विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील १० विहिरी गुजरातच्या हद्दीत, तर ४ विहिरी मुंबईच्या समुद्रात खोदण्यात येणार आहेत. या विहिरींपासून ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील फ्लेमिंगो अभयारण्यात येणाऱ्या देशी- परदेशी पक्ष्यांना धोका नसल्याचे सांगून सीआरझेड प्राधिकरणाने त्यांना सशर्त परवानगी देऊन याबाबतचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर लांब आहेत. ओएनजीसीच्या प्रस्तावानुसार प्रस्तावित विहिरींचे क्षेत्र पश्चिमेला समुद्रात ४,६२६.१९ चौ. किमी आहे.

ओएनजीसीच्या प्रस्तावानुसार याठिकाणी ४ विहिरी खोदण्यात येणार असून सोबत, एमबी-ओएसएचपी २०१८ आणि एमबी-ओएसएचपी २०१८- ब या प्लॅटफॉर्मचे बांधकाम, या फलांटापासून सागरी पाइपलाइन टाकणे, विहिरींना हूकअप करणे, शिवाय फलाटांपासून किनारपट्टीवरील वांद्रे येथील प्रक्रिया केंद्रापर्यंत पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात ४,६०२ हेक्टरपेक्षा क्षेत्राचे दोन सागरी संरक्षित क्षेत्रे आहेत.

सीआरझेडने घातल्या कोणत्या अटी?
सीआरझेडने तेल विहिरींना परवानगी देताना ज्या अटी घातल्या आहेत. त्यामध्ये खोदकाम करताना घनकचरा, कोणतेही रसायने समुद्रात जाऊन तो दूषित होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. घातक कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने आणि केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या नियमांप्रमाणेच करावी, बांधकामादरम्यान पर्यावरण व्यवस्थापन प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने राबवून समुद्र पर्यावरण आणि जलचरांचे संरक्षण करण्यास सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:15 12-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here