पूरग्रस्तांना 10-15 हजार रूपये देण्यापेक्षा घरे बांधून द्यायला हवीत

0

सांगली | पूरग्रस्तांना 10-15 हजार रूपये देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन घरे बांधून द्यायला हवीत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख सर्व ठीक चाललं आहे, असं समजून चाललेत. पण काही जण सेल्फी काढण्यासाठी पूरग्रस्त भागात जात असतील तर ही स्थिती लवकर ठीक होईल असं मला वाटत नाही, अशा शब्दात पवारांनी नाव न घेता महाजनांवर टीका केली आहे. पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल पण त्यानंतर काय? पूरग्रस्तांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. त्यांच्या हाताला काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान,  लोकांना महापूरामुळे होत असलेला त्रास सांगणं म्हणजे राजकारण नव्हे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here