नाचणे येथे सदनिका फोडून साडेचार लाखांचा मुद्देमाल लांबविला

0

रत्नागिरी : शहरानजीच्या नाचणे येथील सदनिका फोडून अज्ञाताने तब्बल 4 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार सुरेश सहस्त्रबुद्धे (रा. सोहम वैभव अपार्टमेंट नाचणे, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मंगळवार 11 एप्रिल रोजी सकाळी 7.15 वा.केदार सहस्त्रबुद्धे कुटुंबासह बाहेर गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने सहस्त्रबुद्धे यांच्या सदनिकेच्या दरवाजाचा कडी- कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 4 लाख 37 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. सायंकाळी 4 वा. सुमारास सहस्त्रबुद्धे परतले असता त्यांना आपल्या सदनिकेच्या दरवाजाची कडी – कोयंडा उचकटलेला दिसून आला. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 13-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here