रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव यांची सातारा येथे बदली

0

राजाराम एन म्हात्रे रत्नागिरीचे नवे तहसीलदार

➡️ रत्नागिरी : कोकण विभागातील तहसिलादार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

यानुसार रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांचीही बदली सातारा, तहसीलदार येथे झाली आहे. तर रत्नागिरीच्या जागेवर राजाराम एन म्हात्रे (सावंतवाडी तहसीलदार) यांची नियुक्ती झाली आहे.

तहसीलदार शशिकांत जाधव यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत उत्तम अशी कामगिरी केली. या कालावधीत अनेक निवडणुकात देखील त्यांनी अत्यंत कौशल्याने काम केले. एक वक्तशीर अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. प्रशासनाची सर्व माहिती जनतेपर्यंत वेळेत पोहचली पाहिजे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय देत आपले कर्तुत्व सिद्ध केले होते. आता त्यांची सातारा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी राजाराम एन म्हात्रे (सावंतवाडी तहसीलदार) यांची नियुक्ती झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 13-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here