लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न : सुभाष देसाई

मुंबई : लॉकडाऊन सुरु असल्याने फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार आणि दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत येत्या 1 जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी दिली. तसेच देसाईंनी उद्योजकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनदेखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती देसाई यांनी दिली. तसेच याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here