सावर्डे, चिपळुणात रक्तदान शिबिर

चिपळूण : कोरोना पार्श्वभूमीवर सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने कोरोना विषाणूच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दोन टप्प्यात होणार आहे. दि. २ जून रोजी सावर्डेतील एमबीए कॉलेज व ११ जून रोजी चिपळूण शहरातील पाग विद्यालयात शिबिर होईल. सकाळी १० ते ४ या वेळेत शिबिराचे आयोजन होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग व आवश्यक ती काळजी घेऊन शिबिर होणार आहे. शिबिरासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी सहाय्य करणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रूपेश इंगवले व जमीर मुल्लाजी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here