रत्नागिरीतील प्रसिद्ध नेमबाज पुष्कराज इंगोलेवर शिकार प्रकरणी गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रत्नागिरीतील प्रसिद्ध नेमबाज पुष्कराज इंगवले हा मित्रासह शिकारीला गेलेला असताना त्याला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी राजापूर तालुक्यातील कशेळी बांध येथे रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून मारलेला डुक्कर जप्त करण्यात आला असून या प्रकरणी नाटे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरी झाडगाव एमआयडीसी येथे पुष्कराज जगदीश इंगोले (३६) व जाकिमिऱ्या येथील त्याचा मित्र रोहन रामदास बनप यांच्यासह सेंट्रो कार घेऊन कशेळी गावकडी परिसरात शिकारीसाठी गेले होते. शनिवारी रात्री १२ वाजता डुकराची शिकार करून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलिस अधिकारी गस्त घालत राजापूरच्या दिशेने जात होते. कशेळी बांध परिसरात सेंट्रो गाडी संशयास्पदरीत्या उभी असलेली दिसली. त्यांनी चौकशी केली असता त्याच्याकपडे सिंगल बॅलर बंदूक आढळली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गाडीची झडती घेण्यात आली. यावेळी गाडीमध्ये मारलेला डुक्कर आढळून आला.

या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पुष्कराज जगदीश इंगोले आणि रोहन रामदास वनप यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, १२५ वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये नाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शिकार प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला पुष्कराज इंगोले याने दोनच महिन्यांपूर्वी बालेवाडी येथे नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले होते. इंगोले याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 18-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here