”शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जातील”

0

अमरावती : सध्या राज्यामध्ये सत्तांतराच्या चर्चा होत असताना शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जातील असा गौप्यस्फोट भाजप समर्थक युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि मोदी चे काय संबंध आहे हे महाराष्ट्राताला माहिती आहे, दोघेही एकमेकांचा सन्मान करता, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांचे पाय पकडले. हे महाराष्ट्रानं पाहिलं, जेव्हा शरद पवार यांनी एक वक्तव्य केले तर उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचे पाय पकडावे लागले त्यांना माहीत आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरील हात काढला तर उद्धव ठाकरे सोबत दोन आमदार सुद्धा राहणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.

जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी ,अमित शहा हिरवा कंदील देतील, तेव्हा अजित पवार हे भाजप सोबत जातील देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांचा हिरवा कंदील केव्हाही देऊ शकते तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल होतील. असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

अजितदादा भाजप सोबत जाणार नाहीत – यशोमती ठाकूर
सत्ता संघर्षाचा निकाल केव्हाही येऊ शकतो तर 16 आमदार अपात्र झाले तर अजित पवार हे भाजप सोबत जाऊ शकते अशी चर्चा आहे, या चर्चेच काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी खंडन केलं, मला असं काही वाटत नाही की अजित दादा असं करतील असं काही झालं तर राजकारण किती खालच्या दर्जावर राजकारण जाईल हे पण समजून घ्यावं तर ईडी सरकार महाविकास आघाडीला अस्तिर करण्याचा प्रयत्न करत आहे, अजित पवार भाजप सोबत जाईल असं काही होणार नाही असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 18-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here